गोवा

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘सजग’ या तटरक्षक दलासाठीच्या गस्तीनौकेचे जलावतरण

पणजी [] गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधणी केलेल्या ‘सजग’ या गस्तीनौकेचे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री

गोवा [] सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोली तालुक्याला पूराचा धोका

गोवा []  सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोली तालुक्याला पूराचा धोका, डिचोली नदीच्या पाण्याची पातळीत

वास्को-बेळगावी दरम्यान नव्या पॅसेंजर रेल्वे सेवेची सुरुवात

पणजी []  प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वास्को-बेळगावी दरम्यानच्या पॅसेंजररेल्वे सेवेला आज हिरवा बावटा दाखविण्यात आला. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) वसंरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याहस्ते वास्को रेल्वे स्थानकामध्ये या सेवेचे लोकार्पण झाले. याप्रसंगी श्रीपाद नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ही सेवासुरु झाल्याचा अत्यंत आनंद आहे. या सेवेची आवश्यकता होती. गोवा आणिबेळगावचे वेगळे नाते आहे, व्यापारी संबंध आहेत. या सेवेमुळे आता प्रवाशांचे कामसोपे झाले आहे. काही काळानंतर आठवड्यातून दोनदा धावणारी ही पॅसेंजर रेल्वेदररोज सुरु करावीच लागेल. तसा प्रतिसाद या सेवेला नक्की मिळेल. दूधसागरधबधबा सारखी पर्यटन स्थाने पाहण्यासाठी ही गाडी उपयोगी ठरेल; अशा खूपअर्थांनी ही पॅसेंजर रेल्वे फायदेशीर आहे. ही रेल्वे सेवा सुरु केल्याबद्दल त्यांनी केंद्रीयरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कौतुक करून आभार मानले. ब्रॉडगेजमुळे बंद पडलेली आणि पावसामुळे उशीर झालेली ही रेल्वे सुरु करतानासमाधान वाटत आहे, अशी भावना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी यावेळीव्यक्त केली. सुरक्षा व स्वच्छता आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर असल्याचे अंगडीयांनी यावेळी नमूद केले. पर्यटन, सामाजिक संबंध, बेळगावच्या शेतकऱ्यांनाउपलब्ध होणारी बाजारपेठ यासाठी ही रेल्वे महत्वाची असल्याचे ते म्हणाले. गोवाराज्यातील पर्यटन संधी पाहता येथे अधिकाधिक रेल्वे सेवा देण्याचा केंद्रीय रेल्वे मंत्रीपियुष गोयल यांचाही मानस असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. देशाचीअर्थव्यवस्था पर्यटनातून वृद्धिंगत करता येईल, असा आशावाद त्यांनी याप्रसंगीव्यक्त केला. योगाने जगाला जोडले; तसे रेल्वे देशाला जोडण्याचे माध्यम बनली आहे,असेही ते म्हणाले. प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. बहुप्रतीक्षित अशी ही पॅसेंजर रेल्वे वास्को व बेळगावी शहरांना जोडणार आहे. फारकमी एक्स्प्रेस रेल्वे गाड्या या शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी उपलब्ध होत्या;शिवाय या गाड्या थांबण्याचा कालावधी देखील अत्यंत कमी होता. शिवाय दोनशहरांमधील भूप्रदेश पाहता वर्षभर रस्ते वाहतूक देखील उपलब्ध होत नव्हती.यामुळेच या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वे सेवेची दीर्घकालीन, सतत व मोठी मागणीहोत होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या मागणीचा आढावा घेऊननवी पॅसेंजर रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. ही पॅसेंजर रेल्वे आठवड्यातून दोन दिवस खानापूर, गुंजी, लोंडा, तिनाईघाट, कॅसलरॉक, कुलेम, संवेरदम, चांदर, मडगाव, कानसौलीम आणि दाबोळी येथे थांबे घेतप्रवास करणार आहे. एकूण 168 किमीचा हा मार्ग आहे. महत्वाचे म्हणजे ब्रीगान्झाघाट व दूधसागर धबधबा अशा रमणीय भागातून ही रेल्वे जाणार आहे. या पॅसेंजर रेल्वेमुळे दैनंदिन नाशवंत पण गरजेच्या भाजीपाला, फुले, दूग्धजन्यपदार्थ अशा गोष्टी गोव्यामध्ये येतील आणि गोव्यातील मत्स्योत्पादन, समुद्री अन्नखानपूर, बेळगावी मध्ये पोहचू शकेल. याशिवाय दोन राज्यातील या दोनशहरांमधील सांस्कृतिक व सामाजिक संबंध दृढ करण्यास ही सेवा आपली महत्वपूर्णभूमिका बजावेल. या पॅसेंजर रेल्वेचे क्रमांक 06922/06921 असे आहेत. यामध्ये एकूण 10 बोगी आहेतज्यापैकी 8 बोगी सामान्य दुसऱ्या वर्गाच्या आहेत तर दोन बोगी सामानासह दुसऱ्यावर्गाच्या आहेत. वास्को स्थानकाहून दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी ही पॅसेंजर रेल्वेनिघेल आणि रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी पॅसेंजर रेल्वे बेळगावी येथे पोहचेल. तसेचबेळगावी स्थानकाहून सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही पॅसेंजर रेल्वे निघूनवास्कोला दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचेल. दिनांक 6 सप्टेंबर रोजी वास्को येथून पहिल्यांदा ही पॅसेंजर रेल्वे आपला प्रवास सुरुकरणार आहे. 6 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रायोगिक तत्वावर ही पॅसेंजर रेल्वेदूधसागर धबधबा येथे थांबेल. या कालावधीत येणाऱ्या अनुभवावरून दूधसागरधबधबा येथील थांब्याची सेवा सुरु ठेवायची की नाही हे ठरविण्यात येणार आहे.     Share

पश्चिम क्षेत्रीय परिषदेमुळे केंद्र व राज्यांतील संबंध दृढ होण्यास मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पणजी [] पश्चिम क्षेत्रीय परिषद राज्यासाठी सार्थक असून राज्या-राज्यामध्ये आणि केंद्र व राज्यांमध्ये या परिषदेमुळे समन्वय

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी नौदलाच्या तुकड्या तैनात

पणजी [] कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात मदतकार्य करण्यासाठी  भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या पाच

पणजी – गोव्यातील काँग्रेसच्या १० आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात केला प्रवेश

पणजी [] कर्नाटक पाठोपाठ आता गोव्यातही काँग्रेसला खिंडार पडले आहे. गोव्यातील काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी

वास्को – अशोका वृक्ष कोसळून दुचाकीस्वराचा मृत्यू.

वास्को [] शनिवारी (दि.२२) पहाटे वास्कोतील स्वतंत्रपथ मार्गावर असलेले भलेमोठे जुने अशोका वृक्ष कोसळले असून

नवी दिल्ली – भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या संयुक्त कवायतीचा पहिला टप्पा गोव्याच्या किनाऱ्याजवळ सुरु.

नवी दिल्ली [] ‘वरुण 19.1’ या भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या संयुक्त कवायतीचा पहिला टप्पा गोव्याच्या