सिल्लोड – आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शहरात 4 हजार 12 कुटुंब लाभार्थी

सिल्लोड [] गरिबांना आरोग्याच्या मोफत सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने आयुष्यमान भारत ही योजना आणली आहे. मोठ्या लोकांना आजार झाल्यास त्यांना सर्वकाही शक्य होते. मात्र गरिबांना जर मोठा आजार झाला तर त्यांच्याकडे उपचारासाठी पैसा नसतो. 2011 च्या आर्थिक निकषावर हा लाभ देण्यात येणार असून आयुष्यमान भारत चे कार्ड दाखविल्यास मोठ्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार होणार असल्याने आयुष्यमान भारत ही गरिबांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील लाभार्थ्यांना आयुष्यामान भारत योजनेच्या ई – कार्ड चे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्षा राजश्री निकम , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती तथा न.प. चे गतनेते नंदकिशोर सहारे, माजी जि. प. सदस्य देविदास लोखंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुदर्शन अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या योजनेच्या फॉर्म साठी सरकारने 50 रुपये नाममात्र शुल्क आकारले होते. यामध्ये सिल्लोड नगर परिषदेने 20 रुपये शुल्क भरणार असून लाभार्त्यांना केवळ 30 रुपये शुल्क भरायचे आहे.  या योजनेसाठी सरकारने आपला विमा भरला असल्याने लाभार्त्यांना मोफत उपचार मिळणार आहे. एकूण 1250 उपचारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच लहान मुलांना जर कर्करोग झाला असेल तर त्याचा ही उपचार या योजनेत होईल आणि जर ज्येष्ठ नागरिकांचे गुढगे – पाय दुखत असेल तर गरज भासल्यास सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या योजनेत होणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

यावेळी महिला बचत गटाच्या पदाधिकारी, योजनेचे लाभार्थी व महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

 

All News