ग्रामीण युवकांना कुस्ती स्पर्धेसाठी आधुनिक सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार – प्रा. झलवार

सिल्लोड [] भारतात प्राचीन काळा पासून कुस्तीचा खेळ चालू असून आजच्या आधुनिक युगात ग्रामीण भागातील होतकरू युवकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नवयुवकांना प्रोत्साहन देण्यात येणार असून आगामी काळात नियोजनबद्ध पद्धतीने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने प्रा.प्रभुलाल झलवार यांनी माहिती दिली.

 

तालूक्यातील पांगरी येथे अनंतचतुर्थी निमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. गावांतील नवतरुण यांनी पुढाकार घेऊन मागील वर्षीपासून मैदानी कुस्त्यांचे आयोजन करून तरुणांनी ह्या कुस्त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कुस्त्यामध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पहिलवान यांनी या कुस्त्यामध्ये भाग घेतला. अत्यंत पारदर्शक पद्धतीने कुस्त्या लावून पंचांनी आदर्श कुस्त्या लावून बक्षीस देण्यात आल्याचे समाधान पाहिलवानांनी व्यक्त केले.कुस्त्यांचे उदघाटन सदानंद महाराज यांचे हस्ते करण्यात आले.अंतिम कुस्ती संदिप आणि आबा या पहिलवान यांच्यात झाली.

प्रसंगी रामराव तायडे, वसंता तायडे,दामुआण्णा गव्हाणे, ज्ञानेश्वर जाधव,कांतीलाल झलवार, गजानन झलवार,प्रा.दत्तू पंडित, प्रा.शालीक तायडे, प्रा.राजू पाचोळे, विठ्ठल पाचोळे, भगवान जाधव, दिनेश ढाकरे,भाऊसाहेब पंडित,चांदमिया, अजगर अली,एकनाथ तायडे, भगवान सोनवणे, गणेश माहोर, अशोक झलवार,संदीप झलवार वाळूबा जाधव,कौतिक जाधव आदींनी कुस्त्यांचे यशस्वीतेसाठी प्रयत्न करून सहकार्य केले.

 

 

 

All News