अमरावती – महिलेचा रुग्णवाहिकेअभावी वेळेत उपचार मिळू न शकल्याने मृत्यू

अमरावती []  रुग्णांसाठी चोवीस तास रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून दिल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असताना एका महिलेचा रुग्णवाहिकेअभावी वेळेत उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मोर्शी येथे उघडकीस आली आहे. दुर्दैवाचे फेरे येथेच थांबले नाहीत, तर महिलेची भरचौकात उघडय़ावर प्रसूती झाली. तिला नंतर मालवाहू रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आले.वरूड आणि मोर्शी येथील शासकीय रुग्णालयाची ढिसाळ यंत्रणेमुळे या गर्भवती महिलेचा बळी गेला आहे. आशा परशुराम बारस्कर (३५, रा. जरूड) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

All News