अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली [] महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. हाच पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

 

All News