महात्मा गांधींच्या स्वप्नातला नवा भारत आकार घेतोय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली [] महात्मा गांधींच्या स्वप्नातला नवा भारत आकार घेतो आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. नवा भारत अर्थात न्यू इंडिया सशक्त आणि बळकट असेल याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत अभियान सुरु केलं. या अभियानाशी सामान्य लोकांपासून अगदी तारे तारका, खेळाडूही जोडले गेले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. हे माझे एकट्याचे यश नाही १३० कोटी भारतीयांचे यश आहे असंही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.