स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या वैचारिक प्रभावामुळे ढाक्यात उभारणार विवेकानंद भवन

नवी दिल्ली [] ढाक्यामध्ये विवेकानंद भवन उभारलं जाणार असा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झाला आहे. ढाका येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद भवनाचा प्रकल्प उभारला जाणार. या दोन महान व्यक्तींचं आयुष्य आपल्याला कायम प्रेरणा देतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपला समाज आणि मूल्यांवर स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच विवेकानंद भवन ढाका येथे उभारण्यात येणार आहे. या भवनामध्ये 100 हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी संशोधन स्कॉलर्सना राहण्याची संधी उपलब्ध होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पार पडलेल्या या करारानंतर या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

मागील वर्षभरात भारत आणि बांगला देश यांच्या 12 संयुक्त प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. दोन्ही देशांमधली एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे ही बाबही समाधानकारक आहे असंही मोदी म्हणाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या गुरुवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर शेख हसीना यांचा हा पहिलाच दौरा आहे.