मुंबई -न्याय हक्काच्या लढ्यासाठीच शिवसेनेचा जन्म – उद्धव ठाकरे

मुंबई [] मागील पाच वर्षे शिवसेना सत्तेत असताना सातत्याने जनतेचा आवाज उठवत आली आहे. शिवसेनेचा जन्म सत्ता प्राप्तीसाठी झालेला नाही. न्याय हक्काच्या लढ्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. याचबरोबर ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेतील जबाबदारी आणि अधिकार यांचे समसमान वाटप हा अतिशय महत्त्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे २४ तारखेला निकाल आल्याच्या आठ-दहा दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होईल, तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळले, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.