सिल्लोड – प्रभाकर पालोदकर यांना विजयी करण्याचा निर्धार

 

सिल्लोड [] सिल्लोड मतदार संघात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर याना भाजपासह विविध पक्ष ,संघटनानी पाठींबा दिला असून  या संदर्भात एका पञकार परीषदेत  सुरेश बनकर व  उमेदवार प्रभाकर पालोदकर यानी दिली माहीती.  यावेळी मोठ्या संखेने पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी  अपक्ष उमेदवार म्हणुन प्रभाकर पालोदकर याना भाजपाचे राजीनामे दिलेले निष्ठावान पदाधाकारी व इतर पक्ष ,संघटनाच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला असुन मागील १५ वर्षा पासून सुरु असलेले दहशतीचे , दडपशाहीचे वातावरण नष्ट करण्यासाठी विजयादशमिच्या पावन पर्वावर  वाईट प्रवृतीचा नायनाट करण्यासाठी मतदारसंघातील जागरूक बहुजन समाजाने एकत्र येऊन विजयाचा निर्धार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  यावेळी  माजी आ. सांडू पा. लोखंडे,

तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे , दिलीप दानेकर,  सुनील मिरकर , इद्रिस मुलतानी  आदींसह भाजपाचे राजीनामे दिलेले पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संखेने  उपस्थित होते.