पुणे -पीएमपीबसवर मोठे वडाचे झाड कोसळले, बसचालक गंभीर जखमी.

पुणे []  शहरातील मध्य भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये टिळक रोड परिसरात ग्राहक पेठेसमोरून जात असलेल्या एका पीएमपीबसवर मोठे वडाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत बसचालक गंभीर जखमी झाला आहे.

संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच आकाशात काळेकुट्ट ढग निर्माण झाले होते. त्यामुळे अंधार पडण्याआधीच सर्वत्र अंधाराची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ७ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.  दरम्यान, शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाली आहे.

 

All News