कोल्हापूर – आम्ही सत्तेत असलो तरी जिथं चुका होतात तिथं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं – आदित्य ठाकरे

कोल्हापूर [] आघाडी सरकारने विकास कामे करण्याऐवजी फक्त मजा-मस्ती केली. राज्यात गटा-तटात व जाती-जातीत भांडणं लावली, अशी बोचरी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विरोधकांवर केली. कोल्हापूरात प्रचारसभेवेळी ते बोलत होते. राज्याचा सर्वांगीण विकास हा आपला अजेंडा असून ठाकरे घराण्याला मंत्रीपद अथवा मुख्यमंत्रीपदाची राजकीय महत्त्वकांक्षा नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

हातकणंगलेचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर, कागलचे उमेदवार संजय घाटगे आणि चंदगडचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या प्रचाराचा नारळ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फोडण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सत्तेत असलो तरी जिथं चुका होतात तिथं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिवसेना राजकारणाऐवजी समाजकारणाला महत्व देते.

 

All News