बीड – दसरा मेळाव्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थित.

बीड [] दरवर्षीप्रमाणे भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे मंगळवारी आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उपस्थित होते. “मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे,”असं सांगणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाची सुप्त ईच्छा त्यांच्या समर्थकांच्या तोंडून बाहेर पडू लागली आहे. बीडकरांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं, अशी मागणी केली. सावरगावमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर बोलत असताना मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री करण्याची घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी सुरू राहिल्याने अमित शाह यांनाही भाषण काही मिनिटात उरकावं लागलं.

दरवर्षीप्रमाणे भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे मंगळवारी आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंकजा मुंडे यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर अमित शाह यांनी बोलायला सुरूवात केली. शाह यांनी ३७०चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी एकच घोषणा द्यायला सुरूवात केली. घोषणा होती. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची. अमित शाह बोलत असताना हमारी मुख्यमंत्री कैसी हो, पंकजा मुंडे जैसी हो, सीएम… सीएम… सीएम अशा घोषणा मुंडे समर्थ देत राहिले. गर्दीतून घोषणांचा स्वर वाढतच जात असल्याने शाह यांनी काही मिनिटात भाषण संपवले आणि रवाना झाले. या घोषणा सुरू असताना मात्र, पंकजा मुंडे या हात जोडून बसल्या होत्या.