औरंगाबाद – आरेची पुनरावृत्ती वाल्मीत होणार ?

औरंगाबाद [] एकीकडे प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करायची आणि दुसरीकडे विकास कामाच्या नावाखाली हजारो झाडाची पर्वा न करता बांधकाम करण्यासाठी परवानगी देऊन झाडाची कत्तल करायची असा एक कलमी कार्यक्रम सध्याच्या सरकारने चालवला आहे वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची जवळ जवळ दोन हजार फळझाडें आणि पूर्ण विकसीत जैवविविधता असलेल्या 33 एकर जमिन सरकारने नव्याने होत असलेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठसाठी दिल्याने त्यावरील दोन हजार झाडावर कुऱ्हाड अटळ आहे.. यामुळे पर्यावरण प्रेमी मध्ये तीव्र भावना असून वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, मुख्यमंत्री फडणविस, विभागीय आयुक्त औरंगाबाद सुनील केंद्रेकर यांनी यात लक्ष घालावे    लवकरच याविषयी न्यायालीन लडाई लडन्यासाठी सर्व पर्यवरण प्रेमीनि एकत्र येऊन लढा उभारन्याचे आव्हान सामाजिक कार्यकर्ते गणेश खेत्रे यांनी औरंगाबाद येथे केले

करोडी येथील 50एकर जमीन   सर्व प्रथम विधी विद्यापीठासाठी देण्यात आली होती पण तत्कालीन कुलगुरू डॉ एस सूर्यप्रकाश यांना ती पसंतीस नं उतारली नाही व पाणी नसल्याचे काहीतरी कारण देऊन जमीन घेण्यास नकार दिला

वाल्मी प्रक्षेत्रावरील सध्यस्थति मध्ये विद्यापीठास देण्यात आलेल्या गट क्र. 17 व 18 मध्ये गेल्या विस वर्षांपासून पोसलेले 725 आंब्याचे झाड, 118चिकू, 333चिंच, बोराची 55, आवळा नारळ याची 298तर बांधावर जांभळाची 18 अशी एकूण 1557 झाडें आहेत जुने तसेच मागच्या वर्षी लावलेले अजून काही झाडें आहेत तसेच मोर, ससा, हरण यांचे अस्तित्व येथे वेळोवेळी जाणवते काही बड्या राजकीय लोकांच्या जमिनी शेजारी आहेत त्यांना फायदा होवा म्हणून हा घाट घातल्याची चर्चा स्थानिक पर्यवरण प्रेमी कडून होत आहे

 

 

 

All News