पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना 2018 तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना 2019 मधला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर

पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना 2018 तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना 2019 मधला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

५७ वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी व्यक्ती आहेत. त्या आपल्या पिढीतील व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. २०१८मध्ये त्यांना ‘फ्लाईट्स’ या आपल्या कांदबरीसाठी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजने गौरविण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.

तर ऑस्ट्रिअन कादंबरीकार आणि अनुवादक पीटर हँडके (वय ७६) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येने प्रभावित होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले होते. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखनही केले आहे. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला १९७८ मध्ये कान फेस्टिवलमध्ये १९८० मध्ये गोल्ड अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. तसेच १९७५ मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म अॅवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून ते नावारुपाला आले होते.