संधी दवडू नका सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

मुंबई [] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला जरी जागा कमी मिळाल्या असल्या तरी ताकत मात्र वाढलेली आहे. भाजपला स्पष्ट बहुमतापासून बरंच दूर राहावं लागत असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असून शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी सुरु केली आहे. यात आता काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह केला जाऊ लागला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला दिला आहे. तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील ‘संधी’संदर्भात स्वानुभव कथन करत आदित्य यांना सल्ला दिला आहे.