भाजपाने राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणं हा लोकशाहीचा अपमान – संजय राऊत

मुंबई [] भाजपाने राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणं हा लोकशाहीचा अपमान आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शेवटचं हत्यार म्हणून राष्ट्रपती राजवटीचा इशारा दिला जातो आहे का? असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा केली त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. सरकार स्थापनेसाठी विलंब होणं ही काही मोठी बाब नाही. मात्र अशात सत्ताधारी पक्षाचे मंत्री राष्ट्रपती राजवटीचा इशारा देत आहेत याला काय अर्थ आहे? असंही संजय राऊत यांनी विचारलं आहे.

अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेना युतीधर्माचा पालन करणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात शेतकऱ्यांचेही प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र सरकार स्थापन झालेले नाही. अशात योग्य कालावाधीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असा इशारा देण्यात येतो आहे. सरकारमधील मंत्री अशा प्रकारे भाषा करत आहेत ही बाब म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.