शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र आमच्याकडं –राऊत

मुंबई [] “विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची पहिली संधी त्यांनाच आहे. जर भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर असून, आमच्याकडे शिवसेनेला पाठिंबा देणारी पत्र आहेत,” असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

राऊत म्हणाले,”राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते सोबत घेतले तरीही त्यांचे १०५ आमदार निवडून आले आहेत. सभागृहात १४५चा आकडा सिद्ध करण्यासाठी भाजपाकडं ईडी आहे. आज ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहे. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे,” असं राऊत म्हणाले.

भाजपाला सरकार स्थापन करणं जमलं नाही, तर शिवसेना १४५चा जादूई आकडा सिद्ध करून दाखवू. शिवसेना सरकार बनवू शकते. सरकार बनवण्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र आमच्याकडं आहेत. भाजपा सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेऊ आणि पाठिंब्यांची पत्र दाखवू,” असा दावा राऊत यांनी या मुलाखतीत केला आहे.

 

All News