बेंगळुरू – ‘OYO हॉटेल्स अँड होम्स’च्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल.

बेंगळुरू [] ‘OYO हॉटेल्स अँड होम्स’चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. रितेश अग्रवाल यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेलच्या रुम्सचं 35 लाख रुपये भाडं ‘ओयो’ने दिलं नाही, असा आरोप एका हॉटेल मालकाने केलाय.

बेंगळुरूच्या डोमलर भागातील ‘हॉटेल रॉक्सेल इन’चे मालक बेट्स फर्नांडीस यांनी ओयो हॉटेल्सच्या संस्थापकाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ‘ओयो’ने हॉटेलमधील रुम बुक केल्या होत्या आणि त्यासाठी दर महिन्याला ७ लाख रुपये भाडं ठरलं होतं. पण, मे महिन्यापासून आतापर्यंत एकही पैसा मिळालेला नाही, असं बेट्स यांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. रितेश अग्रवाल आणि अन्य सहा जणांना गुरूवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

All News