पासवान यांनी कांद्याची उपलब्धता आणि दरांचा घेतला आढावा

नवी दिल्ली [] केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज देशभरातल्या कांद्याची उपलब्धता आणि दरांचा आढावा घेतला. अन्न आणि ग्राहक व्यवहार खात्यांचे सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना तसेच दरवाढीला जबाबदार कारणांबाबत या बैठकीत चर्चा झाली. अवकाळी पाऊस आणि दोन चक्रीवादळांचा परिणाम कांदा उत्पादनांवर आणि कांद्याच्या वाहतुकीवर झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पासवान म्हणाले की सरकार कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ती पावले उचलत आहेत. 56 हजार 700 टन कांद्याला अतिरिक्त साठा तयार करण्यात आला असून नाफेडकडे 1525 टन कांदा उपलब्ध आहे. कांदा निर्यातीवरही बंदी घालण्यात आल्याचे ते म्हणाले.