नवी दिल्ली – अनुसूचित जातीचे अ, ब,क,ड प्रवर्ग करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली []   अनुसूचित जाती प्रवर्गातील उपेक्षित , दुबळ्याना, वंचिताना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून आरक्षणाचे अ, ब,क,ड प्रवर्ग करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे  दिल्ली येथील  सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

अनु सूचित जाती मध्ये ५९ जात समावेश असून साधारण १ कोटी ३२ लाख लोकसंखेला १३ टक्के आरक्षण उपलब्ध आहे. एका बाजुला निम्म्या संखेत बौद्ध समाज आहे तर निम्म्या लोकसंखेत उर्वरित राहिलेल्या लोकसंखेत ५८ जातीचा समावेश आहे. त्या सर्व उपेक्षित समाजाला वर आणण्यासाठी दुबळ्याना, वंचिताना विकासच्या प्रवाहात आणण्यासाठी  घटनाकारानी  स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली आहे. अनेक अनुसूचित जाती मधल्या समाज घटकांनी जात वार आरक्षण मिळावे यासाठी मागणी केली होते. आरक्षण हे जातीवर नसून समूहावर असते हे विचारात घेता स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेबांनी भटक्या विमुक्ता मध्ये प्रवर्ग निर्माण केला. तसेच ओबीसी आणि विमुक्ताच्या धर्तीवर अनुसूचित जाती मधेही प्रवर्ग निर्माण करावा. आणि लोकसंख्या प्रमाणात मागासवर्गीयात देखील अ ब क ड प्रमाणे करण्यात यावा अशी मागणी आन्द्रप्रदेश पासून  महाराष्टात गेली २० वर्षा पासून चालू आहे. त्याला यश म्हणून भारतातील १२ राज्यानी असे केंद्राला कळविले आहे. तर महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला शिफारस करण्याचे आश्वासन नागपूर आधीवेशांत दिले आहे. गेली २ वर्ष प्रयत्न केल्या नंतर उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात अ,ब,क, ड प्रवर्ग लागू करण्यासाठी याचिका दाखल करावी असे प्रयत्न सुरु होते त्याला यश आले असून सर्वोच्च न्यायालयामध्ये ४ नोव्हेंबरला दालनात न्यायालयाने ऐकून घेऊन सुनावणीसाठी येत्या १५ तारखेला ठेवली आहे. दोन वर्षाच्या तरुण कार्यकर्तेच्या कष्टाला यश आले असून पहिल्यादाच न्यायालाने याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यापुढे मेहरा समिती, लोपूल समिती,हुकुमशहा समिती , सदाशिव आयोग, न्या. राजू आयोग असे पाच आयोग व त्याचे अहवाल सादर केले असून आणखी सहा राज्याचे अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. एकूणच शंका घेणार्यांनी विधीतज्ञांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खर्चाला मदत केल्यास आम्ही शांत बसू आणी तरुणांनी, शंका घेणाऱ्यानी पुढे येऊन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शंका निर्माण केल्या पेक्षा निधी गोळा करून सर्वोच्च न्यायालयाची अंतिम लढाई लढणे हे तरुणाईचे  खरे कर्तव्य आहे. प्रसिद्ध विधीतज्ञांण्याच्या मदतीने तरुणांनी पुढे ढोबळे यांचा कामात काही अडथळा निर्माण झाल्यास पुढील काम थाबु नये या कामी तरुणांनी समोर येण्याची अपेक्षा ढोबळे यांनी केली आहे. यावेळी अजित केसराळीकर, अजय साळुंखे उपस्थित होते