व्यवसायामुळे उद्भवणारे आजार, पुनर्वसन आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात भारत आणि जर्मनीत करार

नवी दिल्ली [] व्यवसायाच्या स्वरूपामुळे उद्भवणारे आजार, पुनर्वसन आणि दिव्यांग विमाधारी व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात भारत आणि जर्मनी यांच्यातल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.

लाभ:-

या करारामुळे दिव्यांग विमाधारी व्यक्तींचे व्यावसायिक आणि

सामाजिक पुनर्वसन क्षेत्रात माहितीचे आदान-प्रदान करायला प्रोत्साहन मिळणार आहे.

व्यवसायाच्या स्वरूपामुळे उद्भवणारे आजार  रोखणे, निदान आणि उपचार

प्रभाव:-

माहितीच्या देवाण घेवाणी मुळे क्षमता वृद्धी आणि  दिव्यांग विमाधारी व्यक्तींचे  सामाजिक पुनर्वसन होण्याबरोबरच व्यवसायाच्या स्वरूपामुळे उद्भवणारे आजार  रोखणे, निदान आणि उपचार सुलभ होणार आहेत.