नवी दिल्ली – आयोध्या प्रकरणी आज निकाल.

नवी दिल्ली [] रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागणार आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं असून, देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.