कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी –गडकरी

 

नवी दिल्ली [] अयोध्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला असून  यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन म्हणाले की, आपल्या लोकशाहीत न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जो काही राममंदिरासंदर्भात निर्णय होणार आहे त्या निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. सर्वांनी शांतता ठेवावी, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. असं आवाहान गडकरी यांनी केलं आहे.