मुंबई – सोनेरी अक्षरांनी लिहावा असा हा दिवस आहे – उध्दव ठाकरे

मुंबई [] एक नवीन पर्व सुरू होत आहे आपण सर्वांनी मिळून त्याचे स्वागत करूया. मागील वर्षी २४ नोव्हेंबरला दर्शन घ्यायला अयोध्येत गेलो होतो. २४ तारखेला पुन्हा आयोध्येत जाईन. जाताना शिवनेरी किल्ल्यावरील माती मी घेऊन गेलो होतो.या मातीमध्ये काहीतरी जादू आहे. सरकार बनेल सरकारची बनवण्याची काळजी नाही.

आनंद आहे. आज शिवसेनाप्रमुखांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे. अनेक वर्षांचा वाद अखेर संपला. अडवाणी साहेब यांना भेटण्यासाठी मी जाणार आहे. आयोध्या येथे गेल्यावर आपण आपोआप नतमस्तक होतो. २४ तारखेला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथे शिवरायांना वंदन करेन.

या आंदोलनात जे सहभागी झाले होते ते आपल्या सोबत आहेत आणि जे शहीद झाले त्यांना मी वंदन करतो. जे पक्ष तोंडी हिंदुत्व बोलतात त्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे. सोनेरी अक्षरांनी लिहावा असा हा दिवस आहे. ज्या वेळेला शिवसेनेने हा विषय ऐरणीवर आणला तेव्हा बऱ्याच संघटना शिवसेनेसोबत सहमत होत्या.