शिवसेना-भाजप मध्ये बरंच अंतर वाढलंय – जयंत पाटील

मुंबई [] राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आम्ही विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षात असल्यावर सत्ता स्थापनेच्या बाबतीत चर्चा करण्याचा प्रश्न उध्दभवत नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे त्यांनी सरकार स्थापन करावं हीच भूमिका आमची आहे. आणि त्यातून त्या दोघांमध्ये जर अंतर वाढलं तर परिस्थिती ज्यावेळी निर्माण होईल तेव्हा त्याचा विचार करता येईल आज त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. दोघांनी युती तुटलेली आहे असं कुठे बोलले नाही. काल दोघांची मनोगतं ऐकली दोघांमध्ये बरंच अंतर पडलंय असं दिसतंय. आणि दोघात अंतर एवढं वाढलाय की आता दोघं एकत्रित आले तरी सरकार स्थापन करून महाराष्ट्राच्या हिताचा ते विचार करू शकतील याच्यावर आता महाराष्ट्रात कोणी विश्वास ठेवणार नाही. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.