यापुढे देशामध्ये धर्माच्या नावाने नवीन वाद निर्माण होणार नाही – नवाब मलिक

 

मुंबई [] सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादाचा कुठेतरी अंत झालेला आहे. आमची भूमिका सुरवातीपासून होती की, जो सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल तो सर्वानी मान्य केला पाहिजे. निकाल येण्याच्या आधी लोकं बोलत होते जो काही निर्णय येईल त्याचा आम्ही स्वीकार करू. लोकांनी याचं श्रेय घेऊ नये उत्साह साजरा करू नये,कोणाची भावना दुखवू नये ही भूमिका लोकांनी स्वीकारली पाहिजे. आम्हाला आशा आहे यापुढे या देशामध्ये धर्माच्या नावाने नवीन वाद निर्माण होणार नाही. जो निकाल आलेला आहे तो ऐतिहासिक निकाल आहे. अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.