आज बाळासाहेब असायला हवे होते त्यांना खूप आनंद झाला असता – राज ठाकरे

मुंबई [] इतक्या वर्षाची जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे. या संपूर्ण आंदोलनामध्ये जे कारसेवक आहेत त्यांचं बलिदान त्यांनी दिलं ते कुठेतरी सार्थकी लागलं असं आज म्हणावं लागेल. राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण करावं आणि त्याचबरोबर देशामध्ये रामराज्य ही आणावं जेणेकरून, आज लोकांच्या नोकऱ्या जात आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या होत आहेत त्याही संपाव्यात अशी मनापासून इच्छा. आज बाळासाहेब हवे होते हा निर्णय ऐकायला त्यांना मनापासून आनंद झाला असता या निर्णयाचा. सर्वोच न्यायालयाचे मी मनापासून आभार मानतो इतका एक धाडसी निर्णय कोर्टाने घेतलेला आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.