रामजन्म भूमी निकाला वरून नांदेड जिल्ह्यात व शहरात कडक पोलीस बंदोबस्त

नांदेड [] रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून निकाल जाहीर झाला असून या पश्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये व बाजारपेठा कड़कडीत बंद ठेवण्यात आली असून शहरात व जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .त्याच प्रमाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या मार्गात ही सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बदल करण्यात आला.हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप,फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया, पत्रकबाजी टीकाटिपणी देणे, हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असं पोलींसांकडून सांगण्यात आलं आहे.