सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्था राखा- उज्वल निकम

जळगाव [] अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल संवेदनशील तसंच धार्मिक बाबीशी निगडित असल्याने शनिवारी येणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल सर्वांनी स्वीकारला पाहिजे. तसंच समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेचा भंग होणार नाही, धार्मिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जळगावात दिली आहे.