आज बारामतीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील रणजी सामना

पुणे [] बारामतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमला बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळविण्यासाठी अधिकृत मान्यता दिलीय. बारामतीत आजपासून पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तराखंड असा खेळविला जाणार आहे, या सामन्याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा सामना 12 ते 15 फेब्रुवारीमध्ये होणार आहे, याची सर्व तयारी करण्यात आली आहे.