लॉकडाऊनचा काळात घरात केलं चित्रपटाचं शूटिंग केल्या प्रकरणी भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल

सुपौल []  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची

घोषणा करूनही अनेकांनी याचं उल्लंघन केले आहे. बिहारच्या सुपौलमध्ये चित्रपटाचे शूटिंग केल्याच्या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि JDU चे माजी खासदार असणाऱ्या विश्वमोहन कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. इश्क दीवाना या चित्रपटाचे शूटिंग पीपरा या भागातील कटैया गांवात असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये करत होते. एसएसपी मनोज कुमार यांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पूर्व मंत्री विश्वमोहन कुमार यांनी त्यांच्या घरी शूटिंगसाठी भोजपुरी चित्रपटाच्या निर्मात्याला घरीच आमंत्रित केले. त्या्नंतक कटैया गावामध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे हे शूटिंग पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. कुमार यांच्या या बेपर्वाईमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.

स्थानिक पातळीवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र एसएसपी मनोज कुमार यांनी या प्रकरणाचा छडा लावला. पीपरा पोलीस ठाण्यात विश्वमोहन कुमार आणि चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या शूटिंगदरम्यानचे सर्व कॅमेरा जप्त केले आहेत तर अधिक तपास केल्यानंतर प्रकरणातील सर्वांना अटक करण्यात येणार आहे.

गावातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर स्वत: एसएसपी यांनी गावामध्ये येऊन प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकरणांवर गंभीर कारवाई केल्यास सामान्य जनतेलाही लॉकडाऊनचे महत्त्व लक्षात येईल, अशी अपेक्षा एसडीओ क्यूम अंसारी यांनी व्यक्त केली आहे.