पालघर जिल्ह्यात पावसाने जोर

पालघर [] जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात सर्वच भागात चांगला पाऊस सुरू झाला आहे. अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवलाय तर जिल्ह्या समोर कोरोनाचे संकट देखील आहे. सध्या जिल्ह्यात 144 लागू असतानाही काही लोक कायद्याचे उल्लंघन करून पर्यटनासाठी वाहत असलेले धबधबे, धरण, तलाव, झरे, समुद्र किनारे, नद्या, नाले या ठिकाणची वाट धरतात आणि धोका पत्करतात.अशाच घटनेतून आताच जव्हार मध्ये 5 बळी ही गेले याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी कडक धोरण अवलंबलं असून अशा पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास कलम 144 नुसार कडक कारवाई करण्याचा आदेश काढला आहे,,