मागण्या मान्य न झाल्यास साठे युवा मंचचे भोपळा फोडो आंदोलन

 

सिल्लोड [] जन्मशताब्दी निमिताने विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न देण्यासाठी केंद्राला शिफारस करणे, अनुसूचित जाती प्रवर्गाचे aअ,ब,क,ड प्रमाणे वर्गीकरण करणे, बार्टीच्या धर्तीवर डॉ. अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करणे या मागण्यासाठी विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, shardशरद पवार, बाळासाहेब थोरात याना निवेदन दिले असून सदरील mमागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार , बाळासाहेब थोरात आदीसह इतर मंत्र्याचा निवासस्थानासह दालनासमोर अचानकपणे नाकर्तेपणाचा निषेध करीत भोपळा फोडणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि राज्यातील अतिउपेक्षित मातंग समाजाच्या विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये दीड दिवस शिक्षण घेऊन आपल्या परिसरातील दुखी, कष्टी ,पीडित व्यक्तीचे दुख आपल्या साहित्यातून जगासमोर मांडत त्याना न्याय दिला. त्याचे साहित्य हे जगभरातील अनेक विदेशी भाषेत भाषांतरीत झालेले आहे. साहित्यविश्वात भारताचे नाव त्यांनी उच्चस्थानी ठेवले आहे. तसेच हे वर्ष विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्याना देशाचा सर्वोच्च भारतरत्न सन्मान देण्यात यावे.तसेच राज्यातील मातंग समाजाचा सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकास होण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे अ, ब,क, ड प्रमाणे वर्गीकरण करण्यात यावे तसेच बार्टीच्या धर्तीवर डॉ. अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात मांडल्या आहेत.  या निवेदनावर डॉ.सचिन साबळे, सीताराम कांबळे , प्रा. अनिल साबळे,    दौलतराव सिरसाट, सतीश शेलार, भागीनाथ लंबे, शिवाजी हिवाळे, किरण कांबळे आदीच्या स्वाक्षरया आहेत.