राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण

परभणी [] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं बाबाजानी दुर्रानी यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बाबाजानी दुर्रानी यांची शुक्रवारी अँटिजेन चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. बाबाजानी दुर्रानी यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियावरून शनिवारी माहिती दिली.काही दिवसांपूर्वी ताप आणि सर्दी झाली होती. यानंतर कोरोनाची टेस्ट घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासूनच आपल्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‘, असं बाबाजानी दुर्रानी यांनी म्हटलं आहे.