मुर्डेश्वर मंदिर श्रावणात राहणार बंद

सिल्लोड [] तालुक्यातील केळगाव येथील मुर्डेश्वर मंदिर श्रावण महिन्यात बंद राहणार असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन मुर्डेश्वर संस्थांचे पीठाधीश ओमकारगिरी महाराज यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावणात भाविकाची गर्दी होऊन संसर्गाची शक्यता असल्याने हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच या काळात कुठलेही धार्मिक कार्यक्रम होणार नसून मंदिरही संपूर्णपणे बंदच राहील असे सगण्यात येत आहे.