फोटो सोशल मीडियातून व्हायरल केलेल्या ७ जणांविरूद्ध वनविभागाने केला गुन्हा दाखल

नांदेड [] सोमवार  रोजी पाटनूर ग्रामपंचायत या व्हॉट्सअप ग्रुपवर अजगरास मारून त्यास ओढीत नेत असल्याचा फोटो व्हायरल केला होता. या व्हायरल फोटोची वनविभागाने दखल घेतली असून फोटोमधील ७ जणांची ओळख पटवली आहे. अजगराला मारून त्याचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल केलेल्या ७ जणांविरूद्ध नांदेड वनविभागाने गुन्हा दाखल केला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

परमेश्वर दत्ता कोकाटे, सटवाजी डुमणे, राजू गायकवाड, पंडित येळणे, अप्पाराव कोकाटे, रामा पतंगे, नागोराव मिरासे अशी या 7 जणांची नावे आहेत. या सर्वांनी अजर मारल्याची कबुली दिली आहे. त्यांना मुदखेड येथील न्यायालयात हजर केले असून त्यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास व 25 हजारांपर्यंतचा दंड लागू शकतो, असे वनविभागाने म्हटले आहे.