मुंबई – नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई [] बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. लॉकडाउनमध्ये कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. या संदर्भातले वृत्त एका वाहिनेने दिले आहे.