२४ तासात ८ हजार ७०६ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई [] महाराष्ट्रात पहिल्यांदाच बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील २४ तासात ८ हजार ७०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ७ हजार ९२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ७९२४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२७ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-११२१ (३९), ठाणे- २८० (४), ठाणे मनपा-२४२ (९), नवी मुंबई मनपा-३३२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३४३ (११),उल्हासनगर मनपा-९६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (५), मीरा भाईंदर मनपा-१०२ (१), पालघर-६४, वसई-विरार मनपा-१९१ (३), रायगड-२३० (२८), पनवेल मनपा-१७२ (१९), नाशिक-७० (३), नाशिक मनपा-१७९ (२), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-८२ (२), अहमदनगर मनपा-८७, धुळे-११ (१), धुळे मनपा-१४, जळगाव-३२६ (४), जळगाव मनपा-९३ (२), नंदूरबार-१२ (३), पुणे- १६७ (११), पुणे मनपा-११०४ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-६५६ (१५), सोलापूर-१८१ (२), सोलापूर मनपा-१२२ (१), सातारा-११५ (४), कोल्हापूर-२९७ (७), कोल्हापूर मनपा-११६ (१), सांगली-३७, सांगली मिरज कुपवाड मनपा-७० (२), सिंधुदूर्ग-१३, रत्नागिरी-१ (२), औरंगाबाद-४३ (१), औरंगाबाद मनपा-२६७ (४), जालना-२९, हिंगोली-१३ (१), परभणी-१, परभणी मनपा-२, लातूर-६६ (१), लातूर मनपा-४८ (१), उस्मानाबाद-२२ (१), बीड-३४ (२), नांदेड-६० (१), नांदेड मनपा-२० (१), अकोला-१२, अकोला मनपा-४, अमरावती-१७, अमरावती मनपा-३५ (१), यवतमाळ-६५, बुलढाणा-६२, वाशिम-१७, नागपूर-७४, नागपूर मनपा-११७ (२), वर्धा-९, भंडारा-१, गोंदिया-८, चंद्रपूर-४, चंद्रपूर मनपा-२, गडचिरोली-३, इतर राज्य ११ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३ हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत.

राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.