अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र  राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली. “क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे. दोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.