पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे ध्वजारोहण संपन्न

बीड [] स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय  समारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे संपन्न झाला.

याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी  कोरोना आजारावर महामारीच्या आपत्तीमधून जग लवकरच मुक्त होईल,  असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यात देखील यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागाने उपाय योजना केल्या जात आहेत असे ते म्हणाले

यावेळी उपस्थित मान्यवर व शहीद कुटुंबीय यांची भेट घेऊन पालकमंत्री श्री मुंडे यांनी सदिच्छा दिल्या त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत नाळवंडी आणि आणि ग्रामपंचायत  सांडरवनचे  सरपंच व  ग्रामसेवक यांचा प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

All News