आयुष क्वाथ गोळ्यांचे वाटप करून केला वाढदिवस साजरा

सिल्लोड [] येथील मातोश्री हॉस्पिटल येथे वायफळ खर्चाला फाटा देत,सध्याच्या या कोरोनाच्या संकटाला संपूर्ण जग सामोरे जात असतांना , आता गावपातळीवर सुद्धा याचा प्रसार लक्षात घेता, सिल्लोड येथील मातोश्री हॉस्पिटल चे डॉ शेखर दौड यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणारी ,आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेले आयुर्वेदिक आयुष क्वाथ या गोळ्यांची शिवसंवाद च्या सदस्यांना मोफत वाटप करण्यात आले ,या वेळी कोरोना लॉकडाउन च्या संपूर्ण संकट काळात शिवसंवाद च्या सदस्यांनी राबवले विविध सामाजिक कार्यक्रम , कोरोनाच्या अटीतटीच्या काळात दाखवलेली सामाजिक बांधिलकी, या सर्वांची दखल घेऊन छत्रपती शिवस्मारक समिती शिवनगरी जळगाव सपकाळ यांच्या टीम साठी प्रति सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसाच्या दिवशी त्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी समिती चे अध्यक्ष श्री गोकुळ पा सपकाळ यांना एकूण १०० आयुष क्वाथ च्या बाटल्या डॉ दौड यांनी सुपूर्त केल्या याप्रसंगी प्रदीप पा जगताप, दै लोकमत औरंगाबाद चे कृष्णा सपकाळ ,दै लोकमत सिल्लोड चे शामकुमार पुरे, भाऊसाहेब जंगले ई उपस्थित होते., तरुणांनी अभिष्टचिंतन च्या दिवशी अशा प्रकारे पुढाकार घ्यावा व अश्या स्तुत्य उपक्रमाची येणाऱ्या काळात खूप गरज आहे असे आवाहन छत्रपती शिवस्मारक समिती चे गोकुळ पा सपकाळ व छत्रपती शिवाजी महाराज विचार मंदिर चे प्रदीप पा जगताप यांनी केले व डॉ शेखर दौड याचे आभार मानले

 

All News