औरंगाबादमधील सात निष्ठावंत शिवसेनैकांनी मनसेत प्रवेश

औरंगाबाद [] औरंगाबादमध्ये मनसेकडून शिवसेनेला मोठा धक्का मिळाला असून औरंगाबादमधील सात निष्ठावंत शिवसेनैकांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अनिल शिदोरे आणि अभिजीत पानसे आणि संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्या उपस्थितीत विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यात आला अशी माहिती मनसेकडून ट्विट करत देण्यात आली आहे.
मनसेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदं भूषवलेल्यांचा समावेश आहे. यामध्ये काही माजी नगरसेवकही आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

All News