केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूज्य स्वामी श्री नारायण गुरुजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूज्य स्वामी श्री नारायण गुरु जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज आदरांजली वाहिली आहे. ट्वीट संदेशात ते म्हणाले, समाजसुधारक, अध्यात्मिक गुरु आणि समानता व बंधुत्वाचे प्रबळ प्रसारक म्हणून स्वामी श्री नारायण गुरूजी यांनी केरळमध्ये भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध समाज सुधारणेचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, स्वामी श्री नारायण गुरुजींच्या अथक प्रयत्न आणि योगदानामुळे झालेले वंचितांचे सबलीकरण आणि शिक्षणासाठीचे कार्य कधीच विसरले जाऊ शकत नाही. त्यांचे तत्वज्ञान, शिकवण आणि विचार देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोकांचे आयुष्य समृद्ध करतील.

 

All News