अजिंठा येथील झकास पठार बहरला ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

सिल्लोड [ अंजली साबळे ] जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या ह्यू पॉइंट येथील झकास पठार बहरला असून येथील पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुले लक्षवेधी ठरत आहे. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या झकास पठार ची पाहणी केली. अजिंठ्याच्या कुशीत बहरलेले रंगबेरंगी पुष्प पाहून मन प्रसन्न झाले. झकास पठार ने अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात भर पडली असल्याचे प्रतिपादन यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत, पालोद गावचे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, पिंपळदरीचे उपसरपंच किशोर कळात्रे, अजिंठा चे माजी सरपंच अब्दुल अजीज आदींची उपस्थिती होती.

———————————————–

जि.प.चे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्या झकास पठार या संकल्पनेतून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते 20 जून रोजी ह्यू पॉइंट येथे विविध फुलझाडांचे बीजारोपण करण्यात आले होते. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात भर पडावी, येथील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी व स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात हा या मागचा उद्देश होता.

———————————————–

अजिंठा येथील कास पठार आता रानफुलांनी बहरले आहेत. येथील रंगबेरंगी फुले पर्यटकांना आकर्षित करीत आहे. झकास पठार मुळे ह्यू पॉइंट येथे पर्यटकांचा ओघ वाढेल यातून या भागात रोजगाराच्या संधी  निर्माण होतील.

– राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 

All News