युवानेते अब्दुल समीर यांची कीर्तन सोहळ्यास उपस्थिती

सिल्लोड  [ डॉ. सचिन साबळे ]  तालुक्यातील लिहा ( खेडी ) येथे ह.भ.प. संतोष महाराज आढवणे यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी युवानेते तथा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अब्दुल समीर यांच्याहस्ते आढवणे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. लिहा येथील समाधान पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

यावेळी कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक  मारोती पा.वराडे, नगरसेवक शंकरराव खांडवे , सुधाकर पाटील, मनोज झवर, प्रवीण मिरकर, आशिष  कटारिया,लिहा चे सरपंच नामदेव साखळे, उपसरपंच सिताराम गोरे, चेअरमन अशोक सांगळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन बावस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्ण साखळे, अक्षय वराडे आदींची उपस्थिती होती.

 

All News