नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिल्लोड [ डॉ. सचिन साबळे ]  शहरातील जळगाव रोडवरील नव्याने सुरू झालेल्या अजिंठा नर्सरी चा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार  यांच्याहस्ते नुकतेच झाले आहे .

कोरोना संकटात सर्वांना ऑक्सिजनचे महत्व कळाले. गेल्या काळात वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याने त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. पुढील पिढीला आपल्याला काही देणे आहे हे लक्षात घेता तसेच  येणाऱ्या काळात निरोगी आयुष्य जगण्यासाठी नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणाऱ्या वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी  नागरिकांना केले.

यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, युवानेते अब्दुल समीर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, नगराध्यक्षा राजश्री निकम, डॉ.मॅचिंद्र पाखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, सुदर्शन अग्रवाल, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग पा. साळवे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, मतीन देशमुख, शंकरराव खांडवे आदींसह शहरातील व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती.

अजिंठा नर्सरी येथे नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणारे वृक्ष, फळ रोप, विविध फुलांची रोप तसेच दुर्मिळ वनस्पती व वनसंपदा असलेली वृक्ष विक्रीसाठी उपलब्ध आहेत.शहरात पहिल्यांदाच भव्य व विविध प्रकारचे वृक्ष उपलब्ध असलेली नर्सरी ची सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकरी व पर्यावरण प्रेमींना सुविधा निर्माण झाली आहे.

 

All News