विविध मागण्यासाठी कोतवाल संघटनेचे तहसीलदाराना निवेदन

सिल्लोड [ डॉ. सचिन साबळे ] कोतवालाच्या विविध न्याय मागण्यासाठी कोतवालाची संघटना मागील अनेक वर्षा पासून विविध जण आंदोलने उभारून लढा देत आहे. मात्र शासन स्तरावर अद्याप पर्यंत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने आता कोतवाल संघटना आक्रमक झाली आहे. येत्या 12 डिसेंबर पर्यत कोतवालाना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी, तलाठी व इतर पदाच्या भरती साठी 25 जागा राखीव ठेवण्यात याव्या, सेवा निवृत्ती नंतर पेन्शन सुरु करण्यात यावी. तसेच मृत्यू नंतर वारसांना सेवेत समावेश करण्यात यावा या मागण्य पर्ण नाही झाल्यातर 13 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. या संदर्भात सिल्लोड येथील कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, सचिव दांडगे जि बी, हरिदास कांबळे , विकास कथले, दतात्रय साळवे, भगवान कांबळे, भीमराव पवार आदीसह संघटनेच्या पदाधीकार्याच्या स्वक्ष्ररया आहेत.

 

All News