राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते 13 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

सिल्लोड [ डॉ.सचिन साबळे ]   महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील मोढा बु., वडोद चाथा, वडाळा, बोजगाव, अंभई, शेखपूर, पिंपळगाव घाट येथे रस्ते व विविध विकासासाठी शासनाच्या विविध विभागातून जवळपास 13 कोटी 50 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. शनिवार ( दि.6 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते विविध गावात या मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या कामाला त्वरित सुरुवात होणार असल्याने वरील गावात विकास कामांसोबत प्रमुख रस्ते चकाचक होणार आहेत.

 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे,  नायब तहसीलदार शैलेश पटवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर मराठे, शाखा अभियंता महावीर कांबळे, विशाल चाटे, मुख्यमंत्री सडक योजनेचे सुनील गुडसुरकर, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश राजगुरू आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

मोढा बु. येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मोढा, मंगरूळ ते रहिमाबाद रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 50 लाख,  वडोदचाथा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत गुरूनाथ मंदिर ते अंबाबाई देवी मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख, तर प्रजिमा – 5 ते अंबाबाई देवस्थान पर्यंत जोडरस्त्याची सुधारणा करणे 25 लाख, वडाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत  वडाळा, वडोदचाथा – भराडी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 5 कोटी 50 लाख, जिल्हा परिषद विभाग अंतर्गत वडाळा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण व तार कंपाउंड करणे 10 लाख, बोजगाव येथे गावांतर्गत रस्ता पेव्हर ब्लॉक बसविणे व गावात पथदिवे बसविणे 10 लाख, अंभई येथे भराडी रस्त्याची दुरुस्ती करणे 2 कोटी, शेखपूर येथे मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत  रा.मा.214 ते मेवातनगर रस्त्याची सुधारणा करणे 35 लाख तर पिंपळगाव घाट येथे आमठाणा , अंभई उंडणगाव रस्त्यावरील खेळणा नदीवर पुलाचे बांधकाम करणे 1 कोटी 60 लाख असे एकूण जवळपास 13 कोटी 50 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

 

All News