राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संत ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या ईमारत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

 

सिल्लोड [डॉ. सचिन साबळे ] सिल्लोड तालुक्यातील  उंडणगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या नवीन ईमारत बांधकामाचे भूमिपूजन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कामासाठी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

 

आधुनिकतेच्या नावाखाली आज आपल्या संस्कृतीचा अनेकांना विसर पडत आहे अशी खंत व्यक्त करीत वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्था निर्माण झाल्या पाहिजेत जेणे करून आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन होईल असे स्पष्ट करीत वारकरी संप्रदायाचे कार्य प्रेरणादायी असून येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी दिली.

 

यावेळी वारकरी शिक्षण संस्था उभारण्यासाठी येथील शेतकरी साहेबराव दांडगे, बाजीराव दांडगे, तेजराव दांडगे यांनी त्यांची जमीन दान दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

All News