मातंग समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर गोरखे यांनी घेतली सुभाष पारधी यांची भेट

नवी दिल्ली [] गेल्या काही दिवसापासून राज्यात ठीक ठिकाणी मातंग समाजावर मोठ्या अन्याय अत्याचाराच्या  घटना घडल्या आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रिय अनुसूचीत जाती  आयोगाचे सदस्य श्री सुभाष जी पारधी यांची दिल्ली येथे आयोगाच्या कार्यालयात भाजपा प्रदेश सचिव श्री अमित जी गोरखे यांनी भेट घेतली. या वेळी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या कुटुंबावर वाढलेल्या  अन्याय अत्याचाराबाबत सखोल चर्चा करण्यात आली यावर आयोग ठोस भूमिका घेत आहे व आगामी काळात आणखी कठोर निर्णय केले जातील असे या वेळी श्री सुभाष जी पारधी यांनी सांगितले.

 

All News